Jalna Murder News

जालना : भोकर्दन नाका येथे तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या; शहरात खळबळ

जालना : शहरातील भोकर्दन नाका परिसरात काल रात्री चार जणांनी दोन तरुणांवर धारदार तलवारीने हल्ला केला. या भीषण घटनेत उमेश इजे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर घटना घडल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी रुपेश शेळके आणि पवन जाधव या दोघांना सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही संजय नगर भागातील रहिवासी आहेत. तर एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना गजाआड केले आहे. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ही घटना का घडली? यामागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

जालना शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी लवकरच उर्वरित आरोपीला अटक करण्याचा विश्वास दिला आहे.

🎥 पाहा व्हिडिओत संपूर्ण माहिती:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top