जालना: क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींशी अनुचित वर्तन केल्याचा आरोप; पोलिसांकडून अटक
जालना शहरातील एका क्रीडा प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या शिक्षकावर चार अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अनुचित वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षकाला रविवारी रात्री अटक केली आहे. हे प्रशिक्षण केंद्र ग्रामीण भागातील मुलींसाठी निवासी स्वरूपात चालवले जाते. येथे प्रमोद गुलाबराव खरात हे क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावरच…
