नांदेड – वसरणी परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात शेकडो महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार आनंदराव बोढांरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना महिला आघाडीच्या नांदेड संपर्क प्रमुख सौ. लक्ष्मी नरहिरे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
कार्यक्रमात नांदेड शहर दक्षिण विभागाच्या महिला प्रमुखपदी ज्योत्स्ना बटावाले यादव यांची अधिकृत निवड करण्यात आली. यावेळी आमदार बोढांरकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून सत्कार केला.
ना. हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार वसरणी आणि शंकरनगर परिसरातील शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. महिला आघाडी संपर्क प्रमुख लक्ष्मी नरहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महिला पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख दिक्षा वनंजे, योगिता गजेंद्र ठाकूर, शहर प्रमुख ज्योत्स्ना गणेश बटावाले यादव, उपशहरप्रमुख कोमल सचिन सोंगे व सुरेखा बालाजी माने यांना देखील नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे यांनी केले होते. उबाटा येथील उपशहर प्रमुख गजानन शास्त्री यांच्या पक्षप्रवेशाचा मान आमदार बोढांरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे, युवासेना दक्षिण जिल्हा प्रमुख बाळू पाटील मोरे, दक्षिण शहर प्रमुख तुलजेश यादव, तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, एसटी सेल जिल्हाध्यक्ष भालचंद्र मोळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वनमाला राठोड, गीता पुरोहित, महिला आघाडी तालुका प्रमुख स्नेहाताई पाटील, उपजिल्हा प्रमुख गवळणताई येवले, शहरप्रमुख चिंचोलकर ताई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी परिसरातील अनेक महिलांनी—ज्योत्स्ना गणेश बटवाले, कोमल सचिन सोगे, रसिका ब्रम्हणवाडेकर, मनीषा भीम सोगे, संगीता मनोज रोतरे, गीता कुरील, ज्योती गजानन शास्त्री, छायाबाई धुलधाणी, ज्योती डूबुकवाड, अश्विनी वावधने—यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे गजानन शास्त्री, रमेश रोत्रे, मुकेश ठाकूर, रितेश जाधव यांनीही पक्षप्रवेश केला.
संचालन सचिन खराणे यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र मोळके यांनी मानले. महिला पक्षप्रवेश सोहळा यशस्वी करण्यासाठी सुधाकर भिसे, बाबू ठाकूर, बालाजी मोरे आणि शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यास परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

rxwkqhkrnekvrnzdhkjglhqsmzxxfi