जालना : जालना जिल्ह्यात (Jalna District) वाळू चोरी (Sand Theft) थांबण्याचे नाव घेत नाही, उलट या वाळू माफियांना थेट महसूल प्रशासनाचा (Revenue Administration) पाठिंबा मिळतोय, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Ex-MLA Kailas Gorantyal) यांनी केला आहे. त्यांनी जालन्याच्या तहसीलदार छाया पवार (Tehsildar Chhaya Pawar) यांच्यावर वाळू माफियांना सपोर्ट (Support) देत असल्याचा थेट आरोप केला आहे.
गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (Collector Dr. Shrikanth Panchal) यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे जालन्यात महसूल खात्यात (Revenue Department) खळबळ उडाली आहे.
दुधना नदीत खुलेआम वाळू चोरी
जालना जिल्ह्यात वाळूबंदी असतानाही अनेक नदीपात्रात रात्रीच्या वेळी वाळू उपसा सुरूच आहे. जालना शहरातील दुधना नदीपात्र (Dudhna Riverbed) हे वाळू माफियांचे हॉटस्पॉट (Hotspot) बनले आहे. येथून दररोज मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जाते आणि ती अवैधरित्या विक्रीस (Illegal Sale) काढली जाते.
तहसीलदार पवारांवर गंभीर आरोप
कैलास गोरंट्याल यांनी आरोप केला की, छाया पवार या काही वाळू तस्करांना (Sand Smugglers) पाठिंबा देत आहेत. जप्त केलेल्या ट्रकांना (Seized Trucks) नियमबाह्य पद्धतीने सोडले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “नवीन प्रथा अशी सुरू झालीय की, जर एखादा ट्रक किंवा ट्रॅक्टर वाळू चोरी करताना पकडला गेला आणि त्याच्याकडे कागदपत्रं नसली, तर त्याला दोन ते अडीच लाख रुपये दंड (Fine) भरावा लागतो. मग एसडीएम ऑफिसकडून (SDM Office) क्लिअरन्स मिळते आणि कलेक्टरला पत्र जातं,” असं गोरंट्याल यांनी सांगितलं.
पण खास प्रकरण शेळके नावाच्या व्यक्तीचं आहे, ज्याचे ट्रक तहसीलदार छाया पवार यांनी कोणताही दंड न भरता दररोज सोडल्याचा आरोप त्यांनी केला. “नवीन एसडीएम हदगडनी यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शेळकेला कोणतीही परमिशन (Permission) दिलेली नाही, पण तहसीलदार स्वतः त्याला सोडत आहेत,” असं गोरंट्याल यांनी म्हटलं. कलेक्टर पांचाळ यांनी यावर चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
कारवाईची मागणी
गोरंट्याल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “जर हा प्रकार असाच सुरू राहिला तर आम्ही खपवून घेणार नाही.” त्यांनी तहसीलदार छाया पवार यांच्या विरोधात कडक कारवाईची (Strict Action) मागणी केली आहे.

I every time used to study article in news papers but now as
I am a user of internet so from now I am using net for content, thanks to web.
Hi Dear, are you really visiting this web site on a regular basis,
if so after that you will definitely get pleasant experience.
Hmm is anyone else encountering problems with the pictures on this blog loading?
I’m trying to find out if its a problem on my end or if it’s the
blog. Any feed-back would be greatly appreciated.
WOW just what I was searching for. Came here by searching for FxPro raw spread
account