जालना शहरातील बसस्टॅन्ड रोड परिसरात असलेल्या न्यू शिवगंगा लॉज येथे सुरू असलेल्या देहव्यापाराच्या धंद्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) मोठी कारवाई करत आठ आरोपींना अटक केली असून चार पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
गुप्त बातमीदाराने दिली माहिती – लॉजमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की बसस्टॅन्ड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजचे मालक संदीप पांडुरंग राऊत आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना लॉजमध्ये आणून त्यांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवतात.
मिळालेल्या माहितीची खात्री करून ही बाब जालना जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सूचनेनुसार लगेचच छापेमारीची योजना आखण्यात आली.
छापेमारीदरम्यान आठ आरोपी अटक – चार महिला मुक्त
स्थानीय गुन्हे शाखेचे पोनि. पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने लॉजवर छापा टाकला असता खालील आठ आरोपी मिळून आले—
-
संदीप पांडुरंग राऊत – लॉज मालक
-
बाळासाहेब अंकुश जगताप (वय 32, रा. घोटन, ता. बदनापूर) – मॅनेजर
-
निखिल शेषराव हिवाळे (वय 22, रा. खासगाव)
-
राजू नाना गव्हाड (वय 27, रा. बुलढाणा)
-
अनिल वामनराव हिवाळे (वय 29, रा. कुंभारी)
-
गणेश भाऊसाहेब ओळेकर (वय 30, रा. तळणी)
-
शिवाजी भाऊराव ओळेकर (वय 30, रा. तळणी)
-
अमोल जगन जंजाळ (वय 30, रा. कुंभारी)
त्याचबरोबर चार पीडीत महिलांची सुटका करण्यात आली. जागेवरून ₹1,01,270/- इतका रोकड मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 6 प्रमाणे गुन्हा नोंदवला.
हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी पोउपनि गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला आहे.
कारवाईत पोलिसांचा सक्रिय सहभाग
या संपूर्ण कारवाईत पुढील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहभाग महत्त्वाचा ठरला—
-
मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल
-
मा. अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी
-
उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी
-
पोनि. पंकज जाधव (स्थानीय गुन्हे शाखा)
कारवाईत सहभागी कर्मचारी—
पोउपनि गणेश शिंदे, पोउपनि रवी जोशी, पोहेकॉ कृष्णा देठे, महिला अंमलदार संगिता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी ही मोहीम यशस्वी केली.
जिल्ह्यातील देहव्यापाराविरोधात मोहीम सुरूच राहणार
जालना पोलिसांनी या कारवाईनंतर स्पष्ट केले की शहरात व जिल्ह्यात चालणाऱ्या देहव्यापार व मानव तस्करीसारख्या गुन्ह्यांविरोधात पुढील काळात आणखी कडक मोहीम राबवली जाणार आहे. समाजात अशा अनैतिक कृत्यांना जागा नसून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

One thought on “बसस्टॅन्ड रोडवरील न्यू शिवगंगा लॉजवर पोलिसांचा छापा ८ आरोपी जेरबंद – ४ पीडीत महिलांची सुटका”