jalna murder news 18 yaer boy

Jalna Murder News : जालन्यात पोटात चाकू भोसकून १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पारनेर फाट्यावर खळबळ

जालन्यात थरारक हत्या; पारनेर फाटा परिसर हादरला

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पारनेर फाटा येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोटात चाकू भोसकून १८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत तरुणाची ओळख

या  प्रकरणात मयत तरुणाचे नाव पवन संतोष बोराटे (वय १८) असे आहे. पवन हा पारनेर फाटा परिसरातील रहिवासी असून तरुण वयातच त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

चिठ्ठीचे कारण ठरले जीवघेणे

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पवन बोराटे याने आरोपीच्या बहिणीला एक चिठ्ठी दिली होती. या अत्यंत किरकोळ कारणावरून आरोपी संतप्त झाला. या jalna murder news घटनेत किरकोळ वाद थेट हत्या पर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

रात्रीच्या सुमारास चाकू हल्ला

काल रात्री संशयित आरोपी राहुल खरे याने पवन बोराटे याच्याशी वाद घालत शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हत्या करण्याच्या उद्देशाने पवनच्या पोटात चाकूने दोन गंभीर वार केले. या jalna murder news घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

उपचारापूर्वीच मृत्यू

चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या मुळे बोराटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिस कारवाई; आरोपी ताब्यात

या प्रकरणी मयताचे वडील संतोष बोराटे (वय ४५) यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी राहुल खरे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. jalna murder news संदर्भात पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

कठोर कारवाईची मागणी

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकरणात दोषीला कडक शिक्षा मिळावी, अशी नागरिकांची भावना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top