Jalna Majur Kamgar Sahakari Sangh Election
जालना जिल्हा मजूर कामगार सहकारी संघाच्या (Jalna Majur Kamgar Sahakari Sangh Election) चेअरमन व उपचेअरमन पदाची निवडणूक अलीकडेच पार पडली. ही निवडणूक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जालना यांच्या उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र हुसे यांनी निवडणूक प्रकिया पुर्ण केली यावेळी त्यांना प्रशासक शरद तनपुरे, मंगेश जोशी व प्रदीप मघाडे यांनी सहकार्य केले
या निवडणूक प्रक्रियेत चेअरमन पदासाठी महेंद्र रत्नपारखे यांचा तर उपचेअरमन पदासाठी संभाजी वाकडे यांचा प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. कोणताही विरोधी अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी उमेशचंद्र हुसे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.
या वेळी संघाचे संचालक अभयकुमार यादव, महेंद्र रत्नपारखे, रवी जगदाळे, दादाराव पाचफुले, संभाजी वाकडे, रमेश कुलकर्णी, सय्यद अकबर, कांताबाई रत्नपारखे, मथुराबाई किल्लेदार, प्रल्हादसिंग काकस, नानासाहेब उगले, राजू सोळुंके, शेषराव ढवळे व प्रकाश जाधव हे उपस्थित होते.
तसेच संघाचे व्यवस्थापक धनराज नगराळे व लिपिक लईक लहाने मॅडम यांचीही उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व उपचेअरमन यांचे उपस्थितांनी अभिनंदन करत संघाच्या कार्यात पुढील काळात अधिक प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Also Read : जालन्यात बीडी मजुरांची उपासमार! 7 महिन्यांची मजुरी थकीत | गोरंट्याल कुटुंबाच्या बीडी कारखान्यावर आरोप!
