Jai Maa Group Jalna

जय माँ नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद बलीराम यादव यांची बिनविरोध निवड

जालना (प्रतिनिधी) – कन्हैयानगर येथील जय माँ सामाजिक संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या जय माँ नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद बलीराम यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रकाश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीची घोषणा

समितीच्या 17व्या वर्षीच्या निवड प्रक्रियेत विनोद यादव यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी मागील वर्षीचे हिशेब सादर करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

नवीन पदाधिकारी पुढीलप्रमाणे –

  • अध्यक्ष : विनोद बलीराम यादव

  • उपाध्यक्ष : गोपीनाथ अण्णा, चुन्नु शिवलिंग, अप्पा लिगंडे, किशोर ढेंगळे, दशरथ सरकटे, तुळशीराम गोरे

  • सचिव : अंकुश शितोळे, बापु सळवे

  • सहसचिव : हंसराज बटावाले

  • कोषाध्यक्ष : शिवाजी बोंबाळे, पदमराज भगत

भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

या समितीच्या कार्यामध्ये योगेश भगत, भगगु भगत, धन्नुलाल भगत, पदमराज भगत, शिवाजी बोंबाळे, विश्वनाथ क्षीरसागर, कचरुलाल भगत, प्रकाश राऊत, तुळशीराम गोरे, कचरूलाल भगत, विश्वनाथ शिरसागर, अभिजित कुलकर्णी, सुनील उबाळे, मैचिंद्रनाथ दळवि, नंदकिशोर भगत, मनोज यादव, यांच्यासह असंख्य भाविकांचा समावेश आहे.

गेल्या 17 वर्षांपासून कन्हैयानगर परिसरात भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जय माँ नवरात्र महोत्सव एक आगळा-वेगळा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top