illegal gambling den in Jalna – जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसात दोन मोठ्या जुगार अड्ड्यांवर छापे; 8 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त. पोलिसांची मूकसंमती चर्चेत
जालना: सलग दुसऱ्या दिवशी जुगार अड्ड्यावर छापा, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त | illegal gambling den in Jalna
जालना : जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही छापेमारी करण्यात आली असून, या कारवाईत तब्बल 8 लाख 1850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस खात्यातील काहींनी मूकसंमती दिली का? असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
भोकर्दन नाका परिसरात रविवारी धाड
रविवारी रात्री भोकर्दन नाका पोलीस चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे यांनी कारवाई करत 12 जुगाऱ्यांना अटक केली. पत्त्याच्या क्लबवर चालणाऱ्या जुगार खेळांवर ही धाड टाकण्यात आली.
सोमवारी पुन्हा मोठा खुलासा – 8 लाखांचा जुगार उध्वस्त
रविवारी झालेल्या कारवाईनंतर अवघ्या 24 तासांत सोमवारी रात्री सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने नूरशाहवली दरगाह परिसरात दुसऱ्या अड्ड्यावर छापा टाकला.
13 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून,
🔹 6 दुचाकी,
🔹 1 रिक्षा,
🔹 मोबाईल फोन,
🔹 आणि जवळपास 8 लाख 1850 रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यांना कोण खतपाणी घालतंय?
शहरात सुरू असलेल्या अवैध जुगार धंद्यांना पोलिसांची मूक संमती आहे का?
हा प्रश्न आता नागरिक व सामाजिक कार्यकर्ते खुल्या आवाजात विचारत आहेत.
“सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतच दोन जुगार अड्ड्यांवर सलग दोन दिवस छापे पडत असताना, याआधी ही अड्डे चालू कसे होते?”
असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू आहे उपोषण, पण…
गंभीर बाब म्हणजे या अवैध धंद्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असतानाच, शहरात जुगार क्लब बिनधास्त सुरू होते.
त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर संशयाचे सावट अधिक गडद होत आहे.
सदर बाजार ठाण्याचे नाव चर्चेत
या संपूर्ण घडामोडीमुळे सदर बाजार पोलीस ठाण्याचे नाव चर्चेत आले आहे.
अवैध धंद्यांचे गड बनले आहे, असा आरोप सध्या सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
Read More : जालन्यात जिल्हा कारागृह अधीक्षकाच्या घरात मोठी चोरी
One thought on “illegal gambling den in Jalna – जालना शहरातील जुगार अड्ड्यांवर सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी”