illegal businesses in Mantha – मंठा तालुक्यातील गावांमध्ये सुरू असलेल्या दारू व इतर अवैध्य धंद्यांविरोधात महिलांचा आवाज; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी
महिलांचा आक्रोश! मंठा तालुक्यातील अवैध्य धंद्यांविरोधात आंदोलनाची हाक | illegal businesses in Mantha
दारू विक्रीने संसार उद्ध्वस्त – जिल्हाधिकाऱ्यांकडे महिलांचे निवेदन
जालना | प्रतिनिधी
मंठा तालुक्यातील अंबोडा आणि आसपासच्या गावांमध्ये बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध्य दारू विक्री व इतर धंद्यांविरोधात (illegal businesses in Mantha) महिलांनी जोरदार आवाज उठवला आहे. सामाजिक कार्यकर्त्या सारिका वरणकर यांच्या नेतृत्वात महिलांनी आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अवैध्य दारू विक्रीमुळे संसार उद्ध्वस्त
महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे –
-
मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध्यरीत्या दारू विक्री केली जात आहे.
-
या दारू विक्रीमुळे पुरुष दारूच्या आहारी गेल्याने कुटुंबांमध्ये कलह, मारहाण व आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
-
संसार देशोधडीला लागल्याचे अनेक उदाहरणं महिलांनी मांडले.
इतरही अवैध्य धंद्यांचे साम्राज्य
महिलांनी त्यांच्या निवेदनात असेही नमूद केले की –
-
फक्त दारू विक्रीच नव्हे तर जुगार, गांजा, सट्टा अशा अनेक अवैध्य गोष्टींचे जाळे तालुक्यात पसरले आहे.
-
पोलिस प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे पुढाकार
या संपूर्ण आंदोलनाचे नेतृत्व सारिका वरणकर या सामाजिक कार्यकर्त्या करत असून, त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले –
“महिलांच्या कष्टाने चालणारे घर दारूने उद्ध्वस्त होत आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल.”
प्रमुख उपस्थित महिला
-
अंबोडा गावातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
-
इतर गावांतील महिलांनी देखील पाठिंबा दिला.
-
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारून तपासणी व कारवाईचे आश्वासन दिले.
Read More :
One thought on “illegal businesses in Mantha – मंठा तालुक्यात महिलांची अवैध्य धंदे बंद करण्याची मागणी”