जालना जिल्ह्यात सट्टा, मटका, गुटखा, ऑनलाइन लॉटरीसारखे illegal businesses in Jalna वाढतच आहेत. काँग्रेसने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जालना (प्रतिनिधी) — जिल्ह्यात illegal businesses in Jalna म्हणजेच गुटखा, सट्टा, मटका, ऑनलाइन लॉटरी आणि IPL क्रिकेट सट्टा यासारखे अवैध धंदे उघडपणे चालू आहेत. या गैरकायदेशीर धंद्यांविरोधात असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस संघटनेने कडक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
२१ मे २०२५ पासून जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन, शेख अनीस आणि सुभाष कांबळे हे सातत्याने उपोषण करत आहेत. मात्र illegal businesses in Jalna वाढतच चालले आहेत आणि प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
पोलिसांवर गंभीर आरोप
या आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांनी पोलिसांवर थेट आरोप करत सांगितले की, पोलिस हेच या illegal businesses in Jalna मधून हप्ता घेत असल्याने तेच संरक्षण देत आहेत. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी संतप्त नाराजी व्यक्त करत त्यांना तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.
जालन्यात मटका क्वीन, बुकींचा खुलेआम धंदा
नवीन जालना भागात ‘मटका क्वीन’ शिवकन्या कमलकिशोर बंग, मोदीखाना येथील शिवलिंग आप्पा काटकर, तर जुन्या जालना विभागात शंकर लुंगे हे प्रसिद्ध बुकी आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही MPDA अंतर्गत कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळे illegal businesses in Jalna अधिकच बळावत आहेत.
गरीब जनता अडकतेय या धंद्यांत
या अवैध धंद्यांमुळे गरीब जनता मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडत आहे. गोरगरीब लोक लॉटरी व सट्टा यात पैसे घालून त्यांची संपूर्ण बचत गमावत आहेत. अनेकजण गुटखा खाऊन कॅन्सरसारख्या रोगांनी पीडित झाले आहेत. उपचारासाठी पैसे नसल्याने मृत्यूच्या दाढेत जात आहेत.
मुलं, तरुण हे सुद्धा या सापळ्यात
हे illegal businesses in Jalna आता लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी व तरुणांनाही आपले शिकार बनवत आहेत. त्यांचे भवितव्य अंधकारमय होत चालले असून त्यांना या दलदलीतून बाहेर काढणं कठीण झालं आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मुख्य मागण्या
-
illegal businesses in Jalna वर तातडीने बंदी घालावी.
-
आरोपींवर MPDA अंतर्गत कारवाई करावी.
-
पोलिस विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावं.
-
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना तत्काळ हटवावं.
-
जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.
जालना जिल्ह्यातील illegal businesses in Jalna हे दिवसेंदिवस वाढत असून जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसचे उपोषण म्हणजे या जनता-विरोधी व्यवस्थेच्या विरोधातील एक आक्रोश आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने जर लवकरच पावले उचलली नाहीत, तर जालना हे गुन्हेगारीचे केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही.
Watch Full Video On Youtube
Read More : जालना मध्ये Matka Queen Gangibai चा साम्राज्य, पोलिस घेतात हफ्ता – ‘लोकप्रश्न’चा धक्कादायक खुलासा!