Electric cremation scam in Jalna

Electric cremation scam in Jalna | रामतीर्थ विद्युत शवदहन प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा उघड

जालना रामतीर्थ परिसरातील Electric cremation scam in Jalna प्रकरणात मोठा घोटाळा समोर आला आहे. कोरोना काळात कोट्यवधी खर्चून बसवलेली विद्युत शवदहन वाहिनी आजही बंद असून ठेकेदाराने बोगस काम करून बिल काढल्याचे आरोप. नागरिकांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

जालना शहरातील रामतीर्थ परिसरात कोरोना काळात नागरिकांच्या सुविधेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून विद्युत शवदहन वाहिनी बसविण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पात मोठी आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, हे काम त्यावेळचे काँग्रेस नगरसेवक जगदीश भर्तिया यांनी एका इतर एजन्सीच्या नावाने घेतले होते. बांधकामाचे काम थातूर-मातूर पद्धतीने, कोणतेही परीक्षण न करता केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे, काम पूर्ण न करताच कोट्यवधी रुपयांची बिले उचलल्याची माहिती समोर येत आहे.

शवदहन लाइन आजही बंद – कुत्त्यांचे वास्तव्य

विद्युत शवदहन लाइन कार्यान्वित न झाल्याने संपूर्ण प्रकल्प आजतागायत बंद अवस्थेत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे आता कुत्र्यांचे वास्तव्य झाले असून, ही जागा स्मशानभूमी असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

मनुष्याच्या अंतिम संस्कारासाठी असलेली जागा आज दुर्दशेत पडली आहे. नागरिकांनी सांगितले की, “स्मशानभूमी सारख्या पवित्र ठिकाणालाही ठेकेदाराने सोडले नाही. हा जनतेचा पैशांचा सरळ-सरळ गैरवापर आहे.”

हिंदू संघटना आक्रमक – आंदोलनाची चिन्हे

या प्रकरणी आता हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, लवकरच आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनांचे म्हणणे आहे की, स्मशानभूमीसारख्या धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी भ्रष्टाचार करणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे त्वरित कारवाईची मागणी

नागरिकांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशमा मित्तल यांच्याकडे संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच जालना महानगरपालिकेने तात्काळ विद्युत शवदहन वाहिनी दुरुस्त करून चालू करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “जनतेच्या पैशाचा सदुपयोग न करता भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”

One thought on “Electric cremation scam in Jalna | रामतीर्थ विद्युत शवदहन प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top