Dry port in Jalna – खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जालना ड्रायपोर्टला केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीसाठी परवानगी मिळाली. औद्योगिक विकासासाठी मोठा टप्पा
जालना ड्रायपोर्टला मिळाली आयात-निर्यातीसाठी परवानगी | Dry port in Jalna
खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश, औद्योगिक क्षेत्राला मिळणार चालना
जालना | प्रतिनिधी
जालन्यातील बहुप्रतिक्षित ड्रायपोर्ट (Dry port in Jalna) प्रकल्पाला अखेर आयात व निर्यात (Import-Export) सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. ही परवानगी मिळवण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेला सततचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.
वर्षानुवर्षे रखडलेला प्रकल्प झाला मार्गी
-
जालना ड्रायपोर्ट हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला होता.
-
प्रकल्पाचा उपयोग औद्योगिक मालाच्या आयात-निर्यातीसाठी होणार असून त्यामुळे स्थानिक उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
-
विशेषतः स्टील, औषधनिर्मिती, कृषी-प्रक्रिया उद्योगांसाठी हा ड्रायपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे.
खासदार डॉ. काळे यांचा ठाम पाठपुरावा
-
केंद्रीय पातळीवर सातत्याने चर्चा करत डॉ. काळे यांनी केंद्र सरकारचे लक्ष या प्रकल्पाकडे वेधले.
-
स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, वेळप्रसंगी कठोर शब्दात सूचना देत, काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
-
६ मार्च २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना इशारा दिला होता –
“काम लवकर पूर्ण करा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
औद्योगिक विकासाला नवी चालना
-
ड्रायपोर्टमुळे जालन्यात नवीन गुंतवणूक, रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
-
मालाची वाहतूक कमी खर्चात व वेळेत होऊ शकणार आहे.
-
महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागाला एक नवा व्यापारमार्ग प्राप्त होणार आहे.
Read More : मंठा तालुक्यात महिलांची अवैध्य धंदे बंद करण्याची मागणी
One thought on “Dry port in Jalna – खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या पाठपुराव्याला यश; जालना ड्रायपोर्टसाठी आयात-निर्यात परवानगी”