Road Accident in Jalna: कारची धडक लागून दुचाकीस्वाराचा मृत्यू
जालना – जालना शहरातील क्रीडा संकुलाजवळ 7 ऑगस्ट 2025 रोजी एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मोतीबाग ते अंबड चौफुली मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेत महादेव श्रीराम सोमटकर हे गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला….
