जालना शहरात इनकम टॅक्स विभागाची मोठी कारवाई! उद्योगपती मनोज जयभगवान जिंदल यांच्या बंगल्यासह अनेक व्यापारी, बिल्डर आणि सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी छापेमारी. 46 अधिकाऱ्यांचा ताफा 19 गाड्यांसह शहरात धडकला.
जालना शहरात इनकम टॅक्स विभागाने बुधवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करत शहरातील अनेक उद्योगपती, बिल्डर, व्यापारी तसेच सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईमुळे संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही छापेमारी शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती मनोज जयभगवान जिंदल यांच्या बंगल्यावर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इनकम टॅक्स विभागाचे एकूण 46 अधिकारी आणि कर्मचारी 19 वाहनांसह रात्री उशिरा जालना शहरात दाखल झाले. त्यांनी एकाच वेळी शहरातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली. संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या घरात, कार्यालयात आणि दुकानांमध्ये जाऊन संगणक, लेखाजोखा, आणि इतर आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली.
सलिया उद्योजक मनोज जयभगवान जिंदल यांच्या बंगल्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बंगल्याचे सर्व प्रवेशद्वार बंद करून आत-बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी बंगल्याच्या आत कागदपत्रांची छाननी सुरू ठेवली आहे, तर बाहेर सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांना या छाप्याची माहिती उशिरा मिळाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
इनकम टॅक्स विभागाच्या अचानक धाडीमुळे अनेक व्यापाऱ्यांमध्ये आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही जणांनी आपल्या उत्पादन युनिट्स बंद करून शहरातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. विभागाने गेल्या चार दिवसांपासून शहरातील प्रमुख व्यापारी आणि उद्योगपतींवर गुप्तरीत्या नजर ठेवली होती.
शहरातील अनेक व्यापारी कोट्यवधी रुपयांचा व्यापार करतात, परंतु त्याबद्दल पक्के बिल देत नाहीत. त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात कर महसुलाचे नुकसान होत आहे. सोन्या-चांदीच्या व्यापारातही मोठ्या प्रमाणावर करचोरी होत असल्याचे समोर आले आहे. अनेक व्यापारी ग्राहकांकडून रोख रक्कम घेतात, मात्र त्या व्यवहाराची नोंद खात्यात करत नाहीत. काही व्यापारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून “फोनपे” किंवा इतर अॅप्सद्वारे पैसे घेतात आणि ग्राहकांना फक्त कच्चे बिल देतात.
या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर जीएसटी आणि इनकम टॅक्सची चोरी होत असल्याचे आयकर विभागाच्या तपासातून उघड झाले आहे. विभागाने सर्व संबंधित व्यवसायिकांच्या बँक व्यवहारांवर आणि मालमत्तांवर लक्ष ठेवले आहे.
याआधी देखील, ऑगस्ट 2022 मध्ये इनकम टॅक्स विभागाने जालना येथील सुप्रसिद्ध एस. आर. जी. पित्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एका अन्य कंपनीवर छापेमारी केली होती. त्या कारवाईत विभागाला तब्बल 32 किलो सोने आणि 58 कोटी रुपये रोख मिळाले होते. मात्र त्या प्रकरणाची पुढील चौकशी अद्याप प्रकाशात आलेली नाही.
सध्या मनोज जयभगवान जिंदल यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या छापेमारीमुळे पुन्हा एकदा शहरातील व्यावसायिक वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे, रोकड व्यवहार आणि संपत्तीच्या तपशीलांची सखोल तपासणी सुरू आहे.
या कारवाईनंतर जालना शहरातील अनेक उद्योगपती आणि व्यापारी सजग झाले असून, पुढील काही दिवसांत आणखी छापेमाऱ्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाच्या या मोठ्या ऑपरेशनने जालना जिल्ह्यातील काळा पैसा आणि करचोरीच्या व्यवहारांवर मोठा प्रहार झाला आहे.

⚙️ Need instant results without setup? Tap compress now for one-click, browser-based optimization of images, PDFs, and videos; set targets, preview, and export to meet deadlines, speed pages, and reduce bandwidth with repeatable quality.
🧪 Editors handling mixed sources—notes, transcripts, and CMS exports—can rely on ai remove watermark for text: de-noisify hidden controls, unify quotes/dashes, and standardize line breaks; keywords like ai removing watermarks, watermark remove ai, and remove watermarks ai describe supported actions but remain unlinked to avoid clutter; the goal isn’t to “cheat” detectors, it’s to stabilize formatting so spell-check, plagiarism scans, and style guides work properly, improving readability metrics and preventing rendering bugs in email, EPUB, or PDF conversions.
🔔 Theo dõi deadline dễ dàng với Đồng hồ đếm ngược kèm thông báo chuông—hiển thị lớn, chính xác từng giây, phù hợp thi cử, thuyết trình, Pomodoro.