जालना – जिल्हा मंजूर कामगार संघाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात प्राधिकृत अधिकारी शरद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेला संघाचे व्यवस्थापक धनराज नगराळे यांनी मागील वर्षाचा अहवाल तसेच हिशोब मांडला व पुढील वर्षाचे अंदाजपत्रक सभेसमोर ठेवून खर्चास मान्यता मिळवली. तसेच, ऐनवेळी आलेल्या विषयांवर सभाध्याक्षांच्या परवानगीने ठराव संमत करण्यात आले.
सभेदरम्यान परमेश्वर गरबडे, अभयकुमार यादव, सुनील साळवे यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी परमेश्वर गरबडे यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडत सर्व मंजूर संस्थांना रोटेशन पद्धतीने कामे मिळावीत अशी मागणी केली. या प्रस्तावाला अभयकुमार यादव यांनी अनुमोदन दिले. यावर अंतिम निर्णय घेताना सभाध्याक्षांनी सांगितले की, सर्व मंजूर संस्थांना समान संधी मिळण्यासाठी कामाचे वाटप केले जाईल. यासाठी संघाचे कार्यालय हेच सर्व मंजूर संस्थांचे दफ्तर राहील, तसेच सर्व प्रस्ताव व हिशोब हे संघाच्या वतीनेच आडिट करण्यात येतील. या निर्णयाला सर्व सदस्यांनी एकमताने संमती दर्शवली.
या सभेला मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. यामध्ये संभाजी वाकडे, बबनराव गाढेकर, सुधाकर रत्नपारखी, महेंद्र रत्नपारखी, नटवर किल्लेदार, किरण किल्लेदार, नानासाहेब उगले, सय्यद अकबर, कुलकर्णी, प्रल्हादसिंग काकस, रजनी वानखेडे, सदानंद देशमुख, रंजना राठोड, दिलीप राठोड, कैलास बुजाडे, वसंतराव ढवळे, गणेश मालोदे, विठ्ठल राठोड, अब्दुल रशीद, गणेश अबेंकर, प्रल्हाद तुपेकर, राजु साळुंखे, भगवान समींदर, महादेव काळे, मधुकर गडदे, केशव शिंदे, आकाश रत्नपारखी, सुनील शरेफ यांचा समावेश होता.
सभेचे वातावरण उत्साही व निर्णयक्षम राहिले. यावेळी घेतलेले निर्णय संघाच्या आगामी कामकाजासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले.
