jewellery shop theft in Shrirampur प्रकरणात अहमदनगर क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत जालन्यातून चार चोरांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 11 किलो चांदी व होंडा सिटी कार जप्त.
📍 अहमदनगर – 23 जुलै 2025
श्रीरामपूर शहरातील एका सराफा दुकानातील जवळपास 25 लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा jewellery shop theft in Shrirampur प्रकरणात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या चोरट्यांना जालन्यातून अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 11 किलो 200 ग्रॅम चांदी आणि होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.
चोरीची घटना कशी घडली?
18 जुलै 2025 रोजी पहाटेच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील एका प्रसिद्ध सराफा दुकानाचे शटर तोडून चोरांनी दुकानातील सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जालन्यातून टोळी जेरबंद
या घटनेची गंभीर दखल घेत अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी जालन्यात छापे टाकून चार चोरट्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
-
गोपीसिंग टाक,
-
दीपक टाक – (दोघेही रा. शिकलकरी मोहल्ला, जालना)
-
शिवाजी प्रल्हादराव सासनी – (रा. गांधी नगर, जालना)
-
अमित नंदलाल दगाडिया – (रा. हरिगोविंद नगर, जालना)
पोलीसांनी जप्त केलेले साहित्य
अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:
-
11 किलो 200 ग्रॅम चांदीचे दागिने
-
होंडा सिटी कार (चोरीसाठी वापरण्यात आलेली)
तपास पथकाची कामगिरी
या यशस्वी कारवाईत अहमदनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुळे आणि कर्मचारी अमृत आढाव, रमेश आत्तार, थोरात, सुनील मालनकर, भांड, बाळासाहेब गुंजाळ यांच्यासह जालना तालुका पोलिस स्टेशनचे मेहत्रे यांचा मोलाचा वाटा होता.
पुढील तपास सुरू
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींचा या आधीही गुन्हेगारी इतिहास आहे का, याची चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणी सामील होते का, याचाही तपास सुरू आहे.
Read More : हुंड्याच्या जाचाला कंटाळून सुष्टी मनीयारची आत्महत्या, सासरचे नातेवाईक मृतदेह टाकून फरार

One thought on “jewellery shop theft in Shrirampur: श्रीरामपूरमध्ये सराफा दुकान फोडणारे चार चोर जालन्यात अटकेत, 25 लाखांचा ऐवज जप्त”