देऊळगाव राजा – राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने यंदाही शिक्षण क्षेत्रात आपली यशाची परंपरा कायम राखत दहावीच्या बोर्ड परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. या यशस्वी निकालामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून परिसरातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
या परीक्षेत नेहा शिंदे हिने ९३.४०% गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्यामागोमाग रोहन खरात याने ९१.४०% गुण मिळवत दुसरे स्थान आणि श्रुतिका जाधव हिने ९१.२०% गुण मिळवत तिसरे स्थान मिळवले आहे. याशिवाय अवनी गढीकर (९०.८०%) आणि प्रज्वल दंदाले (८८.८०%) हे विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या विद्यार्थ्यांनी कोणत्याही खाजगी क्लासशिवाय केवळ स्व-अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर आधारित तयारी केली होती. त्यामुळे या यशाचे श्रेय शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या समर्पणाला जाते.
शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके आणि सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यालयाचे सीईओ सुजित गुप्ता, प्राचार्या डॉ. प्रियंका देशमुख, उपप्राचार्य फैसल ओस्मानी, तसेच शिक्षक बाळासाहेब गोजरे, रीना निर्मल, पवन खापरे, मुकुल गवई, निलेश गवई, आकाश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सर्व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापनाकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने यापुढेही अशाच प्रकारे शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत राहावा, अशी अपेक्षा पालकवर्ग व स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

 
			 
			 
			