national consumer day jalna district consumer forum awareness program

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा ग्राहक हक्कांबाबत कायदा 2019 अंतर्गत जनजागृती

जालना | प्रतिनिधी : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जालना यांच्या न्यायदान कक्षात ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील सुधारणा व त्यानुसार ग्राहकांना मिळालेले नवे हक्क याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. डी. पी. पाटील यांनी ग्राहकांचे अधिकार, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया, तसेच आयोगाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
यावेळी ॲड. व्ही. जी. चिटणीस आणि ॲड. एम. जी. सोनुने यांनीही ग्राहक हितासाठी असलेल्या तरतुदींवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड. वसीम रफिक शेख यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा अपर्णा काटे या होत्या, तर आयोगाचे सदस्य दळवी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास जिल्हा वकील संघातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये महिला वकील ॲड. दीपिका घवले, ॲड. आर. जी. दीपवाल यादव, ॲड. नंदकिशोर गौशिक, रोषण गोलेच्छा आणि राकेशसिंग ठाकूर यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत, अन्याय झाल्यास कायदेशीर मार्गाने न्याय कसा मिळवता येतो याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top