Site icon LOKPRASHNA NEWS

Jalna Murder Case: मुख्य आरोपी Umesh Pawar जेलमध्ये, Gajanan Taur हत्या प्रकरणात मोठी कारवाई

Gajajnan Taur Murder Case Upadate 2025

जालना : शहरात गजानन तौर (Gajanan Taur) हत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश पवार (Umesh Pawar) याला पोलिसांनी अटक करून आता जेलमध्ये (Jail) पाठवले आहे. 11 डिसेंबर 2023 रोजी मंठा चौफुली परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या थरारक (Murder Case) घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती.

उमेश पवार याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयाने त्याला न्यायिक कोठडीत (Judicial Custody) पाठवले आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की उमेश पवार याचा याआधीही गंभीर गुन्ह्यांमध्ये (Criminal Record) सहभाग आहे.

या हत्याकांडाच्या (Shootout Case) मुख्य फिर्यादी माउली मांगडे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन आपली आणि आपल्या वकिलाची (Advocate Safety) सुरक्षा मागितली आहे. त्यांच्या वतीने ॲड. रोहित बनवसकर (Advocate Rohit Banvaskar) यांनीही संरक्षणाची मागणी केली आहे.

सध्या पोलिस या प्रकरणात इतर फरार आरोपींच्या शोधात (Police Action) असून तपास अधिक गतीने सुरू आहे. जालना पोलिसांनी (Jalna Police) या गुन्ह्यात आतापर्यंत अनेक संशयितांना अटक केली असून अजून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

गजानन तौर हत्या प्रकरणात (Gajanan Taur Murder) रोज नवे अपडेट येत असून जालन्यातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा खूपच गंभीर मुद्दा बनला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व अपडेट्स तुम्हाला फक्त Lokprashna News वर मिळतील.

Watch This News Related Video On Youtube

Exit mobile version